मुंबई – मराठमोळा अभिनेता ‘रितेश देशमुख’ आणि त्याची पत्नी अभिनेत्री ‘जेनेलिया देशमुख’ हे बॉलीवूडमधील एक क्युट कपल आहे. हे दोघेही सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असतात. आपले फोटोज आणि व्हिडिओ ते सतत सोशल मीडियावर शेअर करत असतात. इंस्टाग्रामवर या दोघांचे प्रचंड फॉलोवर्स आहेत.
सध्या या दोघांचा असाच एक रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जेनेलियासोबतचा आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये या क्युट कपलचा रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओच्या सुरुवातीला रितेश दिसतो आणि बोलतो “माझं स्वत: वर प्रेम आहे, पण… आणि पुढे रितेश आणि जिनिलियाचा व्हिडीओ असून त्याच्या बॅकग्राऊंडला ‘I like me better..’ हे गाणं प्ले होतं असल्याचे दिसते. हा व्हिडीओ शेअर करत “I love myself but….,” असे कॅप्शन रितेशने दिले आहे.
फॅन्स देखील त्यांच्या या रोमँटिक व्हिडिओवर फिदा झाले असून, कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे. अभिनेता रितेश देशमुख नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर पत्नी जेनेलिया सोबतचे असे रोमँटिक व्हिडिओ शेअर करत असतो. 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला 9 वर्षे झाली आहेत.