मराठमोळ्या ‘सई ताम्हणकर’चा ग्लॅमर लूक एकदा पाहाच!

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. सई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

दरम्यान, नुकतंच सईने आपल्या सोशल मीडिया आकाऊंटर काही हटके आणि ग्लॅमर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पिंक रंगाचा ड्रेस परिधान केला असून, यामध्ये सईचा ग्लॅमर अंदाज दिसून येत आहे. सध्या सईच्या या फोटोवर फॅन्सकडून जोरदार लाईक्सचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

Candy floss ! #saitamhankar #shootrready #pinkwink

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)