इंदोर – बादशहा शहाजहान याने आपली प्रिय पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलेली ताजमहाल ही वास्तू म्हणजे तमाम प्रेमीकासाठी एक आदर्श उदाहरण मानले जाते आता याच उदाहरणला समोर ठेवून मध्यप्रदेशमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर ताजमहाल सारखा दिसणाऱ्या घराची उभारणी केली आहे.
आपल्या प्रिय पत्नीला प्रेमाची भेट म्हणून त्याने हे घर बांधले आहे. तब्बल तीन वर्षाच्या बांधकामानंतर ही ताजमहाल सदृष वास्तू उदयास आली आहे. अशोक चोकसे असे या पतीचे नाव असून तो कित्तेक वर्ष ताजमहालच्या प्रेमात होता ही संगमरवरी वास्तु त्याला नेहमीच मोहात पाडायची अशा प्रकारची वास्तू कोठेही नसल्याने त्याच्या डोक्याचे अचानक कल्पना आली की आपण जर अशाच प्रकारचे घर आपल्या पत्नीसाठी बांधले तर काय होईल
मनातील हा विचार पक्का होताच त्याने 2018 मध्ये या घराच्या बांधकामाला सुरुवात केली.
ही ताजमहाल सदृश्य वस्तू वास्तू बांधण्यात तीन वर्षे लागली वास्तु ताजमहाल सारखी दिसत असली तरी प्रत्यक्षात तो एक आलिशान मोठा बंगला आहे. ताजमहाल प्रमाणेच या घरावर 29 फूट उंचीचा घुमट बांधण्यात आला असून चारी बाजूला चार मनोरे ही बांधण्यात आले आहेत. शक्य आहे तिथे सर्वत्र संगमरवराचा वापर केला आहे. या घराच्या फ्लोरिंग साठी त्यांनी राजस्थानातील खास संगमरवर वापरले आहे. संपूर्ण घरामध्ये चार बेडरूम एक मोठा हॉल लायब्ररी आणि मेडिटेशन हॉलही बांधण्यात आला आहे. या बंगल्याचे विद्युतीकरण अनोख्या पद्धतीने करण्यात आले असल्याने अंधारात हे घर ताजमहाल प्रमाणेच बाहेरून चमकत असल्यासारखे दिसते या घरातील फर्निचरही मुंबईतील खास कलाकार बोलवून तयार करून घेण्यात आले आहे.