Taiwan Earthquake | सोमवारी मध्यरात्री तैवानच्या दक्षिणेकडील भागात 6.4 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्काने जमीन हादरली. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली. या भूकंपामुळे 15 जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
यूएस भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने (USGS) दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 12.17 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या युजिंग शहराच्या उत्तरेस 12 किलोमीटर अंतरावर होता. तैवानच्या अग्निशमन विभागाने 15 जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
जखमी झालेल्या 15 जणांपैकी ताइनान शहरातील नानक्सी जिल्ह्यातील एका घराच्या ढिगाऱ्यातून वाचवण्यात आलेल्या बालकासह सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. भूकंपामुळे झुवेई पुलाचे नुकसान झाल्याचीही माहिती समोर आली आहे. भूकंपामुळे कोणत्याही मृत्यूचे अद्याप वृत्त समोर आलेले नाही. Taiwan Earthquake |
यापूर्वी झालेल्या भूकंपात अनेकांनी गमावला जीव
दरम्यान, तैवान पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. हे क्षेत्र दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या मध्ये वसलेले आहे, ज्यामुळे येथे भूकंप वारंवार होतात. 2016 च्या भूकंपात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 1999 मध्ये 7.3 तीव्रतेच्या भूकंपात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. Taiwan Earthquake |
हेही वाचा:
पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे केले अभिनंदन