बर्मिगहॅम – तैवानची बॅडमिंटनपटू ताइ त्सू यिंगने तिसऱ्यांदा आॅल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत तिने चीनच्या चेन युफेईचा 44 मिनिंटामध्ये 21-19, 21-15, असा पराभव केला.
दरम्यान, भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत तिला जपानच्या नाओमी ओकूहाराकडून 12-21, 21-15 व 21-13 असा पराभवाचा सामना करावा लागला होता.
तर याच स्पर्धेत भारताची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिला सलामीच्या लढतीतच पराभव पत्करावा लागला होता. सायनाचा तिसऱ्या क्रमाकांच्या जपानच्या आकाने यामागुचीने 21-11, 21-08 असा पराभव केला होता.