तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद

नोंदी वेळेत घेण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे – खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर सातबारा उताऱ्यांवर नोंदी घेण्यास उशीर होतो. हे टाळण्यासाठी तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे दस्त नोंदणी झाल्यानंतर फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर खरेदीदाराच्या नावाची नोंदणी करण्यासाठी आता तलाठ्यांना ऑनलाईन दस्त उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे खरेदी-विक्रीची नोंदणीची प्रकिया लवकर होण्यास मदत होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दस्त नोंदणी झाल्यानंतर त्यांची फेरफार आणि सातबारा उताऱ्याच्या सदरी कमी कालावधीत नोंद घेता यावी, यासाठी पाच वर्षांपूर्वी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात फेरफार कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्या ठिकाणी एक अव्वल कारकून आणि दोन कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे दस्त नोंदणी झाल्यानंतर तत्काळ या कक्षामार्फत खरेदी आणि विक्री करणाऱ्या नागरिकांना फेरफार उताऱ्यासाठी आवश्‍यक त्या नोटिसा काढून त्यावर दोघांच्याही स्वाक्षरी घेतल्या जात होत्या. त्यानंतर या नोटिसा आणि दस्ताची प्रत या फेरफार कक्षाकडून तलाठी कार्यालयात ऑनलईन पाठविली जात होती. त्यानंतर तलाठ्याकडून कोणाचीही तक्रार नसेल, तर पंधरा दिवसांची फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर नोंद घातली जात होती. त्यामुळे काही प्रमाणात याचा कालावधी कमी झाला होता.

परंतु दस्तनोंदणी करताना खरेदीदार आणि विक्रीदार या दोघांनाही आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. आधार क्रमांकामुळे ओळख पटल्यानंतर दस्ताची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र फेरफार कक्षाची आवश्‍यक नाहीत. “ईज ऑफ ड्युइंग बिझनेस’ अंतर्गत सातबारा आणि फेरफार उताऱ्यावरील नोंदीचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने फेरफार कक्ष बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)