मुंबई – बॉलीवूडचा आघाडीचा कलाकार ‘आय़ुष्मान खुरानाचा’ आज वाढदिवस आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याची पत्नी ताहिरानेही आयुष्मानला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याच्यासोबतचे अनेक फोटो तिने इन्साटाग्रामवर शेअर केले आहेत. त्याला सुंदर कॅप्शनही दिल्या आहेत. त्यात ती म्हणते की ” या लाडक्या आणि प्रेमळ माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी प्रगती आणि होत गेलेला बदल पाहणं माझ्यासाठी खूप खास होत. तुझ्यासोबत आयुष्य खूप सुंदर आहे.” यासोबतच तिने आयुष्मानच्या वाढदिवसाला हजेरी लावलेल्या सर्व कलाकारांसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.
नुकताच आयुष्मान ‘ड्रीम गर्ल’ चितपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या सिनेमाला चित्रपट विश्लेषकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. याशिवाय तो लवकरच बाला चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.