Tag: wandering

निर्दयीपणाचा कळस! क्रूर मुलांकडून जन्मदात्या आईलाच बेदम मारहाण; कपडे फाडत नेले रस्त्यावर फरफटत

निर्दयीपणाचा कळस! क्रूर मुलांकडून जन्मदात्या आईलाच बेदम मारहाण; कपडे फाडत नेले रस्त्यावर फरफटत

नवी दिल्ली: देशात एकीकडे करोनाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या अशा परिस्थितीत ...

हिवाळ्यात करा ‘या’ खास भाज्यांची निवड

करोनामुळे शेतातच कुजतोय भाजीपाला

 वाई - करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायदेखील बंद असल्याने भरमसाठ पैसे खर्च करुन भाजीपाला पिकविणारा विशेषत: हॉटेल व्यावसायिकांना विविध प्रकारच्या देशी विदेशी जातीच्या भाजीपाल्यांचे उत्पादन घेणारा शेतकरी अडचणीत आला. सर्वकाही बंद असल्याने अक्षरश: शेतातच भाजीपाला कुजून जात आहे. एकंदरीतच आर्थिक नियोजन कोलमडल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला आहे. वाईच्या पश्चिम भागातील गोळेगांव येथील जितेंद्र गोळे या तरुणाने खडकाळ जमिनीवर चांगल्या प्रकारच्या स्टॉबेरीसह भाज्यांचे उत्पादन घेवून बेरोजगारीवर रामबाण उपाय शोधला आहे, शेती व्यवसायाला प्राधान्य देत महाबळेश्वर मधील हॉटेल्स व्यवसायिकांना लागणाऱ्या भाज्यांचे उत्पादन घेण्यावर भर दिला. जितेंद्र गोळे हा तरुण स्टॉबेरी, आंब्यासह चायनीज पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यात यशस्वी झाला. संपूर्ण वर्षभर जितेंद्र गोळे यांच्यासह काही प्रगतशील शेतकऱ्यांनी महाबळेश्वर मधील हॉटेल्सना मागणी प्रमाणे भाज्या पुरवित असे, महबळेश्वरमधील हॉटेल व्यवसायिकांच्या भरवशावर चायनीज भाज्यांचे उत्पन्न घेत असे, परंतु सध्या करोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने महाबळेश्वरमधील सर्व हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भाजीपाला मागविण्यात येत नसल्याने गोळे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चायनीज भाजीपाला पडून आहे. याशिवाय वाई कृषी उत्पन्न बाजार समितीत मागणी नसल्याने तो माल शेतातच कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोळेंसह परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांचे वर्षभरासाठीचे केलेले आर्थिक नियोजन पुरपणे कोलमडले आहे. चायनीज भाजीपाल्यांसाठी घेतलेले सोसायटी अथवा बॅंकेचे कर्ज थकणार असून बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी प्रचंड खर्च व सूक्ष्म नियोजन करावे लागते, त्यामुळे अशी अस्मानी संकटे उभी राहिल्यास बळीराजाने कोणाच्या तोंडाकडे पहायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

“हिरकणी’ भिडली सह्याद्रीच्या कातळाला

“हिरकणी’ भिडली सह्याद्रीच्या कातळाला

नगर - येथील भटकंती संस्था वाइल्ड लाइन ऍडव्हेंचरद्वारे आयोजित सांधण दरी येथील साहसी रॅपलिंग या साहसी प्रकारामध्ये पंच्याहत्तर वर्षीय हरिबाई ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Content is protected !!