Thursday, April 25, 2024

Tag: prosper

पुरंदर उपसाच्या पाण्याने शेतकरी समृद्ध

पुरंदर उपसाच्या पाण्याने शेतकरी समृद्ध

दिवे (वार्ताहर) - येथील कोल्हे-पाटील वस्तीमध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी आल्याने शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला. मागील वर्षी स्व. सदाशिवआण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट व दिवे परिसरातील अधिकारी वर्ग व शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुरंदर उपसा पंपहाऊस ते कोल्हे वस्ती अशी पाइपलाइन करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पूर्ण दाबाने मिळू लागले. त्यामुळे परिसरातील बंधारे भरणे सोपे झाले आणि या पाण्यामुळे आता अंजीर, सीताफळ बागांना जीवदान मिळाले आहे.  महिला शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन केले. यावेळी ज्ञानेश्वर झेंडे, उत्तमआबा झेंडे, राजेंद्र झेंडे, नानासो झेंडे, रामदास गायकवाड, मुरलीधर झेंडे, ताराचंद झेंडे, तात्या जगताप, सिंधुताई झेंडे, सारिका झेंडे, मीना झेंडे, सुजाता झेंडे, अर्चना झेंडे, सुभद्रा झेंडे आदी उपस्थित होते.

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही