प्रदूषणावर तोडगा काढा; कुरकुंभकरांचा टाहो

खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढे वाचला तक्रारींचा पाढा

कुरकुंभ – कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या प्रदूषणाबाबर ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचत या समस्येवर कायमचा तोडगा काढावा, अशी आर्तहाक दिली आहे.

शासकीय अधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (दि. 15) कुरकुंभ वसाहतीत आढावा बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, महेश भागवत, वैशाली नागवडे पांढरेवाडी सरपंच छाया झगडे, कुरकुंभ, पांढरेवाडी येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

शासकीय अधिकारी म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता मिलिंद पाटील, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्प व्यवस्थापक अधिकारी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या समोरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करून सोमवारी (दि. 24) पुणे जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांना आश्‍वासन दिले.

दौंड तालुक्‍यातील इतर सर्वसामान्य नागरिकांनी सुळे यांच्यापुढे संबधीत कामांच्या तक्रारींचा पाढा वाचला. खासदार सुळे यांनी प्रदूषणाबाबत गंभीर दखल घेतल्याने कुरकुंभ परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.