नगरपंचायतीच्या इमारतीसाठी मंत्र्यांना साकडे

नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे मंत्री बाळा भेगडे यांना पत्र

वडगाव मावळ – येथील नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी व पाणीपुरवठा योजनेसाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्याकडे गुरुवारी (दि. 18) नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, दिलीप म्हाळसकर, सुनील ढोरे यांनी केली.

याबाबतचे पत्र मावळ पंचायत समितीच्या सभागृहात देण्यात आले. 20 जुलै 2019 रोजी नगरपंचायतीच्या कारभाराला एक वर्ष पूर्ण होत असून वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत झपाट्याने नागरीकरणात वाढ होत आहे. वडगाव नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे काम अनेक वर्षांपासून निधी अभावी रखडले आहे. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध समित्या अध्यक्ष, सभागृह, वाहनतळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय आवश्‍यक आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यासाठी 5 कोटी रुपयांचा निधीची आवश्‍यता आहे.

वाढत्या नागरीकरणाचा विचार करता, शहराला नियमितपणे दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. मावळ तालुका राज्यमंत्री पद मिळाल्याने मावळ तालुक्‍यात सर्वाधिक निधी राज्यमंत्री भेगडे यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. वडगाव नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी साडेआठ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली. राज्यमंत्री भेगडे यांनी नगरपंचायतीच्या विकास कामाला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)