वॉटरकपसाठी गोंदवलेकर राबवणार टाकेवाडी पॅटर्न

धुळवडीआधी गावकऱ्यांनी केली टाकेवाडीतील जलसंधारण कामांची पाहणी

गोंदवले  – वॉटर कप 2019 च्या माध्यमातून गोंदवले खुर्द गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली असून धुलीवंदनाच्या दिवशी सण साजरा करायच्या अगोदर गतविजेत्या टाकेवाडी गावाला भेट देत तिथल्या कामांची पाहणी करून आपण त्याच पद्धतीने काम करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. नुकताच सर्वत्र होळी आणि धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. मात्र गोंदवलेकर ग्रामस्थ यांनी सणाच्या ऐवजी सहभाग घेतलेल्या वॉटर कप कामासाठी वेळ घालवला. धुलिवंदनादिवशी सर्व ग्रामस्थांनी एकत्र जमत महाराष्ट्रात वॉटर कप स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेल्या माण तालुक्‍यातील टाकेवाडी गावाला जाण्याचा बेत आखला.

नुसती कल्पना सांगेपर्यंत सुमारे शंभर युवक जेष्ठ नागरिक चुटकी सरशी तयार झाले. दुपारी 12 वाजता सर्वजण टाकेवाडीला पोहचले. तिथं गेल्यावर आपण माण तालुक्‍यात नसून कुठं तरी बाहेर आहोत, असे वाटायला लागले. गावचे प्रवेशद्वार आणि त्या ग्रामस्थांनी तिथून वॉटर कपमध्ये केलेल्या कामांचे माहिती फलक लावले असून कोणत्या
ठिकाणी काय काय कामे केली आहेत ती कामे किती घनमीटर असून त्यात पडलेल्या पावसाचे किती पाणी अडणार त्यांची संख्या किती आहे अशी अतिशय तंत्रशुध्द माहिती फलकाद्वारे लावण्यात आली. त्यामुळे गावात केलेल्या कामाचा सारांश त्यातून आलेल्या लोकांना पाहायला मिळतो.

अशा नीटनेटक्‍या नियोजनाचा या गावाला फायदा झाला आहे. गावाने केलेल्या माती बांध, कंपार्टमेंट बंडीग, सलग समतल चर, तीव्र उतारावर माथा ते पायथा केलेली कामे अतिशय उत्कृष्ट असून वृक्ष संवर्धन व त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नाफेडमधून केलेली कामे, आगपेटी विरहित शिवार, वाहून जाणाऱ्या पाण्यावर तयार केलेल्या परस बाग, शोषखड्डे या बरोबर शिवार ना शिवार फिरून केलेली कामे काल सर्व गोंदवलेकर ग्रामस्थांनी पाहिली आणि तिथल्या सरपंच आणि ग्रामस्थांशी या कामा बद्दल खूप चर्चा केली. ही स्पर्धा सातत्य राखून काम केले तर सोपी असून कोणीही आपल्या मनात कुठली ही शंका आणायची नाही आपण स्पर्धा जिंकरणारच असा निर्धार करत टाकेवाडीकरांचा निरोप घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)