गतविजेत्या मयुरेशची उपांत्यपूर्व फेरीत धडक

मुंबई – गतविजेता असलेल्या मयुरेश केळकरने युटीटी कॉर्पोरेट टेबल टेनिस स्पर्धेत सहजरित्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.द इंडियन एक्‍स्प्रेसच्या स्टार खेळाडू असलेल्या मयुरेशने पुरुष एकेरी गटातील अ विभागात जे पी मॉर्गनच्या गौरब कारला सरळ तीन गेममध्ये पराभूत केले. मयुरेशने गौरबला 11-3, 13-11, 11-6 असे नमविले.

मयुरेशचा सामना उपांत्यपूर्वफेरीत ब गटात दुसरे स्थान मिळवणाऱ्या मोतीलाल ओसवालच्या कौशिक सुवर्णाशी होणार आहे. ओसवालच्या शशांक रघुनाथने ( ड गटातील विजेता) आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यांचा सामना ऍफकॉन्सच्या रविंद्र एकांडेशी होणार आहे.रविंद्रला एचडीएफसी लाईफच्या सूरज चंद्रशेखरविरुद्ध पराभव पत्करावा लागला असला तरीही हा सामना पाचव्या गेमपर्यंत चालला. यानंतर त्याने माणिक वालियाला 3-1 असे पराभूत करत अंतिम आठ जणांमध्ये स्थान मिळवले.

सूरजने सुखमनीच्या माणिक वालियाला नमवित क गटात आघाडी घेतली. आता त्याचा सामना ड गटातील दुसरे स्थान मिळवणाऱ्या जयंत गुंजलशी होणार आहे.ब गटात शरद सांगळेकरने सर्व सामने जिंकत पहिले स्थान मिळवले. त्याचा सामना अ गटातील दुसऱ्या स्थानी असलेल्या गौरबशी उपांत्यपूर्वफेरीत होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.