पुणे – मुंबई उपनगरचा आदिल आनंद व नाशिकची सायली वाणी यांनी परभणी येथे झालेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे सबज्युनिअर मुले व मुलींच्या गटात अजिंक्यपद पटकाविले. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
आनंदने अंतिम लढतीत जेश मोदीचा 11-4, 0-11,11-4, 11-9,11-4 असा पराभव केला. मुलींच्या गटात सायलीने संपदा भिवडीकरला 7-11, 6-11, 11-6, 6-11, 11-8, 11-7 असे हरविले. मिडजेट मुलांच्या अंतिम सामन्यात शोरेन सोमण या पुण्याच्या खेळाडूने जोहन चिलीपरमंबिल (ठाणे) याच्यावर 10-12 ,9-11,11-7, 11-4,16-14 अशी मात केली. मुलींच्या अंतिम सामन्यात रैना भुता (ठाणे) हिने निशा रिवासकर या पुण्याच्या खेळाडूला 11-1, 11-8, 11-7 असे सहज पराभूत केले. कॅडेट मुलांच्या गटात उदित सचदेव विजेता ठरला. त्याने अंतिम लढतीत युवराज यादवचा 11-2, 11-8, 6-11, 3-11, 11-6, 11-4 असा पराभव केला.
अनाघ बोंडवे व ध्रुव शहा यांना ब्रॉंझपदक देण्यात आले. मुलींच्या अंतिम सामन्यात जेनिफर व्हर्गिसने अनन्या फडकेवर 11-4, 11-6, 11-7, 8-11, 7-11, 11-9 अशी मात केली. देवयानी कुलकर्णी व सुक्रती शर्मा यांना ब्रॉंझपदक मिळाले. कुमार मुलांच्याअंतिम सामन्यात चिन्मय सोमयाने जश मोदीचा 11-2,11-7, 11-8,11-8 असा पराभव केला. आरूष गलपल्ली व शौनक शिंदे हे ब्रॉंझपदकाचे मानकरी ठरले. मुलींमध्ये समृद्धी कुलकर्णी विजेती ठरली. तिने अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथा वर्टीकरला 9-11,14-12,11-5, 9-11,20-18,11-6 असे रोमहर्षक लढतीनंतर हरविले.
अदिती सिन्हा, व विधी शहा यांना ब्रॉंझपदक मिळाले. बक्षीस वितरण समारंभ हेमंत जामकर , डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी विनोद कदम, यतिन टिपणीस, नरेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.