पर्थ : स्टेफनी टेलर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महिला वेस्टइंडिज संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामन्यात थायलंडवर ७ विकेटनी विजय मिळवला. विंडीजची स्टेफनी टेलर ही सामन्याची मानकरी ठरली.
#WIvTHA Well deserved Player of the Match from the Skipper @stafanie07 to lead #WIWomen over the victory line. #WIBoldWIBrave pic.twitter.com/HNQnWDmw4G
— Windies Cricket (@windiescricket) February 22, 2020
थायलंडने विजयासाठी दिलेले ७९ धावांचे लक्ष्य वेस्टइंडिज संघाने स्टेफनी टेलरच्या नाबाद २६(३७), हेली मैथ्यूजच्या १६(१८) आणि शिमेन कैब्मलच्या नाबाद २५(२७) धावांच्या खेळीच्या जोरावर १६.४ षटकांत ३ बाद ८० धावा करत सहज पूर्ण केले. थायलंडकडून गोलंदाजीत सोराया लातेह हिने ३ षटकात २१ धावा देत १ विकेट घेतली. विंडिजचच्या दोन फलंदाज धावबाद झाल्या.
An All-round show by Skipper Stafanie well supported by Campbell help finish off the game for #WIWomen. #WIBoldWIBrave #ItsOurGame #T20WorldCup pic.twitter.com/VhYZoLfx8o
— Windies Cricket (@windiescricket) February 22, 2020
तत्पूर्वी, थायलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना नन्नापट कोनचरोएनकई हिच्या ३३(४८), नरूएमोल चैवईच्या १३(२५), नट्टाकन चंतमच्या ९(९) धावांच्या जोरावर २० षटकात ९ बाद ७८ धावांची मजल मारली होती. विंडीजकडून स्टेफनी टेलर हिने ३ षटकात १३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. हेली मैथ्यूज, अनिसा मोहम्मद, एफी फ्लेचर, शमिलिया काॅनेल, चिनेल्ले हेनरी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.