दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या बुधवारी उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर, दुसरा सामना गुरुवारी पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल.
अ गटात इंग्लंड 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुण आणि +2.464 या नेट रनरेटच्या जोरावर धावगतीसह पहिल्या स्थानावर आहे. तर, ऑस्ट्रेलिया 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुण आणि +1.216 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे.
ब गटात पाकिस्तान सलग पाच विजयांसह अव्वल स्थानी आहे. तर, न्यूझीलंड 5 पैकी 4 सामन्यांत विजय मिळवत 8 गुणांसह +1.162 अशा सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे.
नवा विजेता की गतविजेता
यंदा या स्पर्धेत यापूर्वी पाकिस्तान व इंग्लंड या संघांनी यापूर्वी ही स्पर्धा एकदा जिंकलेली आहे. या स्पर्धेतही हेच दोन संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या संघांना अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही. त्यामुळे यंदा स्पर्धेला नवा विजेता मिळणार की गतविजेताच बाजी मारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.