#T20WorldCup : इंग्लंड महिला संघाचा पाकिस्तानवर विजय

कॅनबरा : हीथर नाइटच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात पाकिस्तानचा ४२ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. हीथर नाइट ही सामन्याची मानकरी ठरली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना हीथर नाइटच्या ६२(४७), नेटली स्कीवरच्या ३६(२९), फ्रैन विल्सनच्या २२(१९) आणि डेनिले वाईटच्या १६(१३) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ७ बाद १५८ अशी मजल मारली होती. पाककडून गोलंदाजीत ऐमन अनवरने ३, निदा दारने २ आणि डायना बेगने १ विकेट घेतली.

त्यानंतर विजयासाठी १५९ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकात ११६ धावसंख्येवर आटोपला. पाककडून फलंदाजीत आलिया रियाजने सर्वाधिक ४१(३३) तर जवेरिआ खानने १६(१०) आणि मुनिबा अलीने १०(१३) धावांची खेळी केली.

इंग्लंडकडून गोलंदाजीत सारह ग्लेन (४ षटकांत १५ धावा) आणि आन्या श्रबसोल (४ षटकांत २५ धावा) यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. कैथरीन ब्रंट (३.४ षटकांत ३२ धावा) आणि सोफी एकलेसटोन (४ षटकांत १२) यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.