#T20WorldCup | भारतीय संघाचा आज इंग्लंडशी सराव सामना

दुबई | आयसीसी विश्‍वकरंडक स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत होण्यापूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे.

यातील पहिला सराव सामना इंग्लंडशी आज (सोमवार) होणार आहे, तर ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघ बुधवारी आपला दुसरा सराव सामना खेळेल.

ही स्पर्धा ओमान आणि अमिरातीत खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचे हे दोन्ही सराव सामने दुबईतच होणार आहेत.

पहिला सराव सामना सायंकाळी साडेसात वाजता, तर दुसरा सराव सामना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.