आयसीसी क्रिकेट ‘टी-20’ विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

भारतीय संघ ग्रुप ऑफ डेथ मध्ये

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2020 ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी- 20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले असून पुरुष आणि महिलांचा विश्वचषक एकाच वर्षी आणि एकाच देशात होण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे. परंतु, पुरुष आणि महिला संघांचे सामने वेगवेगळ्या महिन्यांत होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टी- 20 महिला विश्वचषकामध्ये दहा देश सहभागी होणार असून 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत 23 सामने खेळविले जातील. महिलांच्या स्पर्धेची सुरुवात 2018 स्पर्धेचे विजेते ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या सामन्याने होणार असून अंतिम सामना 8 मार्च म्हणजे जागतिक महिलादिनी मेलबर्नच्या मैदानात पार पडेल.

तर पुरुषांची स्पर्धा 18 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या कालवाधीत पार पडणार असून प्रथम त्यात पात्रता फेरीतील सामने होतील आणि मुख्य 12 संघाची स्पर्धा 24 ऑक्‍टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्या सामन्यापासून सुरु होईल. भारतीय पुरुष संघाचा समावेश हा ग्रुप बीमध्ये आहे.

तर त्यात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दोन पात्रता फेरीतील संघांचा समावेश असेल. त्यामुळे याला ग्रुप ऑफ डेथदेखील म्हटले जात आहे. तर गट अ मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि पात्रता फेरीतील दोन संघ यांचा समावेश आहे.

महिला गट

गट अ – ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, श्रीलंका आणि पत्रात फेरीतील एक संघ
गट ब – इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्थान आणि पात्रता फेरीतील दुसरा संघ
उपान्त्यफेरीचे सामने- मार्च 5
अंतिम सामना – 8 मार्च

पुरुष गट

गट अ – ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि पात्रता फेरीतील दोन संघ
गट ब – भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दोन पात्रता फेरीतील संघ
उपान्त्य फेरीचे सामने – 11 आणि 12 नोव्हेबर
अंतिम सामना – 15 नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियाच्या यजमान पदाबाबत बोलताना आयसीसीचे सचीव डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, ‘जेव्हा कधीही आम्ही ऑस्ट्रेलियाकडे एखाद्या स्पर्धेचे यजमानपद देतो त्यावेळी करोडो प्रेक्षक लाभतील याची आम्हाला शाश्वती असते’. जबरदस्त मैदाने, गोंधळ करणारे, प्रेरित करणारे आणि खेळीची जाण असणारे प्रेक्षक ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. त्यामुळे टी- 20 विश्वचषकाच्या आयोजनाचे संधी ऑस्ट्रेलियाला मिळणे योग्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)