टी 20 विश्वकरंडक – शकिब अल हसनचा नवा विक्रम

मस्कत – बांगलादेशाचा फिरकी गोलंदाज शकिब अल हसन याने रविवारी स्कॉटलंडविरुद्ध दुसरी विकेट घेत एक नवा विक्रम आपल्या नावे केला. विश्वकरंडकटी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाला मागे टाकत अग्रस्थान पटकाविले.

शकिबने स्कॉटलंडच्या मायकेल लीस्क याला शून्यावर बाद केले. या विकेटने त्याने लसिथ मलिंगाला (107) मागे टाकले. डावखुरा 34 वर्षीय फिरकी गोलंदाज शकिबने 89 सामन्यात ही कामगिरी केली. त्याने 2006 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्याने सर्व सातही विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.विश्वकरंडक स्पर्धेत सुपर 12 गटात प्रवेश करण्यासाठी त्यांना ओमानचे आव्हान परतावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.