अबुधाबी – मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कॅरन पोलार्डने पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या सामन्यात विक्रम साकार केला. त्याने आपल्या पहिल्याच षटकात ख्रिस गेल आणि लोकेश राहुलला बाद केले. राहुलला बाद करताना त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण केले.
टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा तसेच 300 बळी घेणारा पोलार्ड जगातील पहिलाच खेळाडू बनला आहे. सर्वाधिक टी-20 करंडक जिंकण्याचा विक्रम पोलार्डच्याच नावावर आहे. त्याने आजवर 15 टी-20 करंडक जिंकणाऱ्या संघांचा भाग असण्याची कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी पोलार्डने 564 टी-20 सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 11 हजार 202 धावा केल्या आहेत.
जगातील केवळ पाच खेळाडू 10 हजारांहून अधिक धावा करू शकले आहेत. त्याने 1 शतक आणि 56 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने 707 चौकार आणि 757 षटकार ठोकले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचे 88 सामने खेळताना त्याने 25 च्या सरासरीने 1 हजार 378 धावा केल्या आहेत. यात 6 अर्धशतके केली आहेत. त्याने 80 चौकार आणि 93 षटकारही फटकावले आहेत.