T Raja Singh On Akabaruddin Owaisi। तेलंगणातील हैदराबाद लोकसभा जागा ही सध्या हॉट सीट बनलीय. या जागेवरून भाजप उमेदवार माधवी लता या एआयएमआयएम प्रमुख आणि विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसी यांना कडवी टक्कर देणार आहेत. त्यातच एकीकडे त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी आपल्या भावासाठी प्रचार करून मतदारांना आकर्षित करत आहेत. मात्र हे करत असताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. त्यांच्या याच टीकेला भाजप नेत्यांनी पलटवारकेलाय.
तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्यावर तुरुंगात विषप्रयोग केला जाऊ शकतो, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर भाजप आमदार टी राजा सिंह यांनी उत्तर देत, “हा मुस्लिमांचा अपमान आहे मते मिळवण्यासाठी दिलेले भावनिक भाषण असल्याचे म्हटले.
‘मुस्लिम मते मिळवण्यासाठी भावनिक भाषण’ T Raja Singh On Akabaruddin Owaisi।
अकबरुद्दीन यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राजा सिंह यांनी, ते (अकबरुद्दीन) लोकसभा निवडणुकीत त्यांचा मोठा भाऊ असदुद्दीन ओवेसी यांचा प्रचार करत असून त्यांनी भावनिक भाषण केले.
राजा सिंह यांनी व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये, “तुम्ही (अकबरुद्दीन ओवेसी) अल्पसंख्याकांसाठी तुम्ही काय केले आहे, जे तुम्हाला जिंकायला लावत आहेत आणि तुम्ही काय करणार आहात यावर बोलायला हवे होते. पण, तुम्हाला भावना हव्या आहेत. मुस्लिमांना भावनिक करून त्यांची मते मागायची हे तुमचे धोरण आहे,” असे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले अकबरुद्दीन ओवेसी?T Raja Singh On Akabaruddin Owaisi।
उत्तर प्रदेशातील गुंडातून राजकारणी झालेले मुख्तार अन्सारी यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत अकबरुद्दीन यांनी आपल्यावर तुरुंगात विष प्रयोग केल्यास काय होईल, ?असा सवाल केला होता. एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले, “…आम्ही घाबरत नाही पण सध्याची परिस्थिती पाहता आमचा मृत्यू कसा होईल हे आम्हाला माहीत नाही. अकबरुद्दीन ओवेसी यांनाही तुरुंगात विष देऊन मारले जाईल की नाही माहीत नाही.” असे म्हटले होते.