T Raja Singh । भाजप आमदार टी. राजा सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्याबद्दल भाष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये राजा सिंह यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज याठिकाणी होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या भव्यतेचे कौतुक केले असून हा मेळा प्रत्येक सनातनीसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. या महाकुंभासाठी त्यांनी ऋषी, संत आणि सनातन्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र हे बोलत असताना त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ज्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजा सिंह यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक टिप्पणी केली आहे, ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की काही मुस्लिम लोक म्हणत आहेत की, ज्याठिकाणी महाकुंभ होत आहे ती 35 एकर जमीन वक्फ बोर्डाची आहे. त्यावर भाजप आमदार यांनी, “बेटा, प्रयागराज सुरू झाले तेव्हा तुमचे वंशजही जन्मालाही आले नव्हते, तेव्हापासून त्याठिकाणी महाकुंभाचे आयोजन केले जात आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.त्यासोबतच त्यांनी महाकुंभसारख्या पवित्र कार्यक्रमाबाबत काही मुस्लिमांच्या नकारात्मक प्रतिक्रिया म्हणजे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे.” असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन T Raja Singh ।
राजा सिंह यांनी पुढे, “काही लोकांना फक्त दोन भाषा कळतात, पहिली भाषण बुलडोझरची तर दुसरी भाषा तुम्ही समजू शकते.” असे त्यांनी म्हटले . तसेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी महाकुंभ आणि इतर धार्मिक कार्यक्रमांवर वाद निर्माण करणाऱ्या लोकांना बुलडोझरच्या भाषेने उत्तर द्यावे” असे आवाहन देखील राजा सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने ते एका नव्या वादात अडकले आहेत.
धार्मिक इतिहासावर भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान T Raja Singh ।
राजा सिंह म्हणाले की, महाकुंभाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा या पृथ्वीवर मुस्लिम समाजाचे लोकही उपस्थित नव्हते. ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा वादाचा बळी ठरली, तर भविष्यात अशा घटनांना आणखी सामोरे जावे लागू शकते, असे ते म्हणाले. या विधानाने भाजप आमदाराने धार्मिक इतिहासावर भर देत या प्रश्नाकडे राजकीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून पाहण्यास सांगितले.