T Raja Singh । हैदराबादच्या गोशामहल विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार टी राजा सिंह यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हैदराबाद पोलिसांनी त्यांना याबद्दल इशारा दिला आहे. पोलिसांनी टी राजा यांना त्यांच्या दुचाकीवरून बाहेर न जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी यासंदर्भात टी राजा यांनी,”बुलेटप्रूफ कार आणि बंदूकधारी सोबत ठेवावेत” असेही हटले आहे. पोलिसांच्या या सल्ल्यावर आता टी राजा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांनी पोलिसांना चांगलेच सुनावले आहे.
हैदराबाद पोलिसांकडून मिळालेल्या पत्राबद्दल टी राजा यांनी, ‘मला पोलिस विभागाकडून एक अधिकृत पत्र मिळाले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की मला धोका आहे आणि मी माझ्या गोशामहल मतदारसंघात माझ्या दुचाकीवरून बाहेर पडणे थांबवावे. त्यांनी मला माझ्या संरक्षणासाठी बंदूकधारी असलेली बुलेटप्रूफ गाडी वापरण्याचा सल्ला दिला. मात्र, माझ्या मतदारसंघात अनेक झोपडपट्ट्या आणि अरुंद गल्ल्या आहेत जिथे बुलेटप्रूफ गाडी चालवता येत नाही आणि याच्यामुळे जनतेला त्रास होतो.” असे त्यांनी म्हटले.
‘मला बंदुकीचा परवाना का देण्यात आला नाही?’ T Raja Singh ।
पुढे टी राजा म्हणाले, ‘माझ्या लोकांसाठी उपलब्ध राहणे हे माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. सायकल चालवल्याने मला त्यांना त्रास न देता त्यांच्याशी जोडता येऊ शकते.. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा मी सुरक्षेच्या कारणास्तव बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला तेव्हा त्याच पोलिस विभागाने माझ्याविरुद्ध खटले असल्याचे कारण देत माझा अर्ज नाकारला. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रलंबित खटले असलेल्या अनेक लोकांना कोणत्याही आक्षेपाशिवाय बंदुकीचे परवाने देण्यात आले होते पण ते मला देण्यात आले नाहीत.” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
पोलिसांच्या पत्रात काय लिहिले होते? T Raja Singh ।
हैदराबाद पोलिसांनी आमदाराला तेलंगणा सरकारने दिलेल्या सुरक्षेचा वापर करण्याचा सल्ला देताना, ‘तुम्हाला सतत धमक्या मिळत आहेत. असेही आढळून आले आहे की तुम्ही तुमच्या घरातून किंवा ऑफिसमधून बाहेर पडून कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय लोकांमध्ये फिरता. या संदर्भात, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फक्त बुलेटप्रूफ कारने बाहेर पडा आणि सरकारने दिलेल्या सुरक्षेचा वापर करा.” असे म्हटले आहे.
हेही वाचा
भारताशिवाय चीनशी स्पर्धा करणे कठीण ! अमेरिकेचा आणखी एक ‘प्लॅन’ ; ‘दक्षिण चीन समुद्रात’ ड्रॅगन अडकणार