System Movie: न्यायासाठी एकत्र लढणार सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका; ‘सिस्टम’ ओटीटीवर या दिवशी होणार प्रदर्शित
System Movie या चित्रपटात दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि वेगळ्या आयुष्य जगणाऱ्या महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. या दोघी मिळून सत्तेविरोधात उभ्या राहत न्यायासाठी लढा देतात. चित्रपटात अनेक थरारक आणि भावनिक प्रसंग पाहायला मिळणार आहेत.

System Movie: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री ज्योतिका यांची नवी फिल्म ‘सिस्टम’ सध्या चर्चेत आहे. कायदा, न्याय आणि सत्तेतील संघर्ष दाखवणारी ही लीगल ड्रामा फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा विषय गंभीर आणि वास्तवाशी जोडलेला असल्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. ‘सिस्टम’ हा चित्रपट २२ मे २०२६ रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. System Movie
या चित्रपटात दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि वेगळ्या आयुष्य जगणाऱ्या महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. या दोघी मिळून सत्तेविरोधात उभ्या राहत न्यायासाठी लढा देतात. चित्रपटात अनेक थरारक आणि भावनिक प्रसंग पाहायला मिळणार आहेत. (System Movie)
सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात नेहा राजवंश नावाच्या सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेहा आत्मविश्वासू, धाडसी आणि आपल्या कामात प्रामाणिक असलेली महिला आहे. तर ज्योतिका सरिका रावत या कोर्ट स्टेनोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. साध्या कुटुंबातून आलेली सरिका शांत स्वभावाची असली तरी न्यायासाठी लढण्याची ताकद तिच्यात आहे. (System Movie)
दोघींचं आयुष्य, विचार आणि परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. पण काही गंभीर सत्य समोर आल्यानंतर त्या एकत्र येतात आणि दबलेल्या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सत्ता आणि नैतिकता यांच्यातील संघर्षही चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. (System Movie)
View this post on Instagram
चित्रपटाचे निर्माते हरमन बावेजा यांनी सांगितलं की, ‘सिस्टम’ (System) ही फक्त कोर्टरूम ड्रामा फिल्म नाही, तर दोन महिलांच्या संघर्षाची कथा आहे. न्याय मिळवण्यासाठी त्या किती मोठा धोका पत्करतात, हे या चित्रपटातून दिसून येईल. त्यांनी सोनाक्षी आणि ज्योतिका यांच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे. (System Movie)
या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केलं आहे. संवेदनशील विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यामुळे ‘सिस्टम’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. चित्रपटात आशुतोष गोवारीकर, प्रीती अग्रवाल, आदिनाथ कोठारे, आश्रिया मिश्रा, गौरव पांडे आणि सयानदीप गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
प्राइम व्हिडीओ आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाचे अधिकारी निखिल मधोक यांनी सांगितलं की, हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. न्याय, महत्त्वाकांक्षा आणि नैतिकतेसारखे विषय खूप रंजक पद्धतीने मांडण्यात आले आहेत. प्रत्येक वळणावर प्रेक्षकांना नवे धक्के आणि रहस्य अनुभवायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (System Movie)
कायदा आणि न्याय व्यवस्थेवर आधारित वेगळ्या धाटणीचा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘सिस्टम’ (System ) हा एक खास अनुभव ठरणार आहे.





