तुर्कीचे हल्ले रोखण्यासाठी सिरीयाचा पुढाकार

ताल्ल तामर (सिरीया): तुर्कीने कुर्दांविरोधात जोरदार हल्ले केले म्हणून सीरियन राजवटीने सोमवारी तुर्कीच्या सीमेकडे आपले सैन्य पाठवून दिले. अमेरिकन सैन्याने माघार सुरू केल्यामुळे सिरीयाच्या सैन्याने या प्रकरणात हस्तक्षेपाची भूमिका घेतली आहे. ईशान्य सीरियामधील स्वायत्त कुर्दांकडे तुर्की सैन्यांचे वेगवान आक्रमण थांबविण्यासाठी अमेरिकन संरक्षणाशिवाय काही इतर फारच थोडे पर्याय शिल्लक होते. उत्तरेकडील प्रांत रक्कामधील तबका आणि ऐन इस्सा या भागात सीरियाने सैन्य तैनात केले आहे, अशी माहिती सीरियाच्या निरीक्षक गटांनी दिली आहे.

सीमेवर असणाऱ्या 3.6 दशलक्ष सीरियन शरणार्थींपैकी काहींना परत पाठवायचे असेल आणि कुर्दिश सैन्य दडपण्यासाठी तुर्कीला आपल्या सीमेवर अंदाजे 30 किलोमीटरचा बफर झोन तयार करायचा आहे. सिरियामधील इस्लामिक स्टेट गटाविरुध्द कुर्दांच्या बरोबर लढा देणाऱ्या अमेरिका आणि त्याच्या साथीदारांनी तुर्कीवरील या हल्ल्याचा निषेध केला आहे, परंतु अमेरिकेच्या धमक्‍या तुर्कीचे हल्ले थांबविण्यात अपयशी ठरले आहेत.
अमेरिका सीरियाच्या उत्तरेकडील एक हजार सैन्य बाहेर काढण्याच्या विचारात आहेत. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांनी सोमवारी या निर्णयाचे स्वागत केले.

पाश्‍चात्य देशांनी आयएसशी संबंधित नागरिकांना मायदेशी परत घेण्यास नकार दिला आणि आपल्याला अमेरिकेचे लष्कर मागे घ्यायचे आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुर्दांनी त्या परिस्थितीबद्दल वारंवार इशारे दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.