लोकसभा उमेदवारांना चिन्हांचे वाटप

सातारा – 45 सातारा लोकसभा निवडणुकीसाठी लढणाऱ्या उमेदवारांना आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप केले. यामध्ये नोंदणीकृत राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे उमेदवार, पक्ष आणि चिंन्ह या प्रमाणे वाटप करण्यात आले आहेत. आनंद रमेश थोरवडे (बहुजन समाज पक्ष) हत्ती, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष) घड्याळ, नरेंद्र आण्णासाहेब पाटील (शिवसेना) धनुष्यबाण.

यामध्ये राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या व्यतिरिक्त नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक चिंन्हे पुढीलप्रमाणे. दिलीप श्रीरंग जगताप (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी) वातानुकुलन यंत्र, सहदेव केराप्पा ऐवळे (वंचित बहुजन आघाडी) कपबशी. इतर उमेदवारांची पुढीलप्रमाणे चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये अभिजीत वामनराव बिचुकले (अपक्ष)- दूरदर्शन संच, पंजाबराव महादेव पाटील (अपक्ष) जेवणाचे ताट, शैलेंद्र रमाकांत वीर (अपक्ष) काटी आणि सागर शरद भिसे (अपक्ष) शिट्टी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.