पुणे – दोन दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये 26 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिला पेटवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी चार नराधमांना अटक देखील केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बालगंधर्व चौकात गनिमी कावा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी बालगंधर्व चौकात निर्भया प्रकरणातील चार आरोपींना प्रतीकात्मक फाशी देऊन जाळण्यात आले आहे.