Syed Mushtaq Ali Trophy : रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व

मुंबई – भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्‍य रहाणेकडे आगामी सय्यद मुश्‍ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी मुंबईवर मुश्‍ताक अली स्पर्धेत साखळीतच पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर विजय हजारे स्पर्धेत पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने विजेतेपद मिळवले.

मुंबईचा संघ – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, आदित्य तरे, सर्फराज खान, अरमान जाफर, हार्दिक तामोरे, तुषार देशपांडे, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलाणी, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, प्रशांत सोळंकी, अमान खान, मोहित अवस्थी, साईराज पाटील, तनुष कोटियन, दीपक शेट्टी, रॉयस्टन डायस.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.