श्रीनगर – जम्मू कश्मीरचे फुटीरतावादी नेते आणि हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांचे श्रीनगर येथील राहत्या घरी निधन झाले. गिलानी बराच दिवसांपासून आजारी होते.
याबाबत जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले असून कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
दरम्यान, सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म 29 सप्टेंबर 1929 रोजी झाला. गिलानी त्यांच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी 2008 पासून नजरकैदेत होते. त्यांनी मागच्या वर्षी हुर्रियत कॉन्फरन्स (जी) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.