पॅरिस – स्वित्झर्लंडचा मानांकित टेनिसपटू रॉजर फेडररने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली असल्याने राफेल नदाल व नोवाक जोकोवीच यांना विजेतेपद मिळण्याची संधी वाढली आहे. उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्यानंतरही त्याने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली.
स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात फेडररने डॉमनिक कॉएफरचा 7-6, 6-7, 7-6, 7-5 असा चार सेटमध्ये पराभव केला होता. मात्र, गुडघादुखीने त्याला परत त्रास होऊ लागल्याने त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. फेडररला गेल्या वर्षभरापासून गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत आहे.
यासाठी गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यामुळे जास्त त्रास होऊ नये यासाठी त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
फेडररने माघार घेतल्याने राफेल नदालकडे 21 वा ग्रॅंडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोवीच एकाच ग्रुपमध्ये आहेत.