स्वीस ओपन बॅडमिंटन : श्रीकांतचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बासेल – ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिच्यापाठोपाठ भारताचा स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत यानेही स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अन्य लढतीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डीने दोन गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. आधी झालेल्या सामन्यात सिंधूने अमेरिकेच्या आयरिस वांग हिच्यावर केवळ 35 मिनिटांत 21-13, 21-14 असा विजय मिळवला. आता सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत बुस्नान ओंगबामरंगफानशी लढत होणार आहे.

पुरुष एकेरीत श्रीकांतने फ्रान्सच्या थॉमस रॉक्‍सेलला 21-10, 14-21, 21-14 असे पराभूत केले. उपांत्यपूर्व लढतीत श्रीकांतचा कांता वॅंगचोरेनशी सामना होईल. अजय जयरामने डेन रास्मस गेमकेवर 21-18, 17-21, 21-13 अशी सरशी साधली. बी. साईप्रणितने पाब्लो ऍबिनला 21-17, 21-12 असा पराभव केला.

मिश्र दुहेरीत सात्त्विकने अश्‍विनी पोनप्पासह खेळताना रिनोव्ह रिवाल्डी व पिथा हॅनिंगचेस याच्यावर 21-18, 21-16 अशी मात केली. पुरुष दुहेरीत चिरागसह खेळताना सात्त्विकने प्रमोद कुसुमवर्दना आणि एरिच रॉम्बितान यांना 21-17, 20-22, 21-17 असे पराभूत केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.