Swiss Open badminton 2021 | सिंधूचे विजेतेपद हुकले

बासेल – भारताची स्टार बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

सिंधूला स्पर्धेच्या अंतिम लढतीत यजमान स्वित्झर्लंडच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरिनकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना मरिनने केवळ 35 मिनिटांत जिंकला.

2019 साली झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेनंतर द्वितीय मानांकित सिंधूने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, मरिनने अंतिम सामन्यात सिंधूला फारशी संधीच दिली नाही.

तिने सिंधूला 21-12, 21-5 अशा फरकाने सहज नमवले. दोन वर्षांनंतर प्रथमच मरिन-सिंधूची लढत झाली. जागतिक स्तरावर मरिनसमोर सिंधूला सातत्याने अपयश येत आहे. तसेच चित्र या सामन्यातही

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.