मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खडकी-पिंपळगाव येथील विहिरीची नोंद करून देतो, असे सांगून शेतकऱ्याकडून 30 हजार रुपये उकळल्याप्रकरणी एकाच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 नोव्हेंबर 2019 पासून उमेश नामदेव इचके (रा. नागापूर) याने खडकी पिंपळगाव हद्दीतील जमीन गट क्र. 195/1/अ मधील विहिरीची नोंद करून देतो, असे सांगून सचिन वसंत टेमगिरे (वय 36, रा. थोरांदळे) यांच्याकडून 30 हजार रुपये घेऊन काम केले नाही, तसेच फसवणूक करून, शिविगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी सचिन टेमगिरे यांनी उमेश नामदेव इचके यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करीत आहेत.