नगरमध्ये रुग्णांची संख्या 26; अजूनही 466 होम क्वारंटाईन
नगर -नगरच्या जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 83 नमुन्यापैकी 82 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय यंत्रणनेचे दिली.
त्यातील एक व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, असून आता नगरच्या वैद्यकीय यंत्रणेने पाठविलेल्या अहवालानुसार करोनाबाधीत व्यक्तिंची संख्या आता 26 झाली आहे. दरम्यान, बधवारी सकाळपर्यंत एकूण 85 नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. या अहवालांची अद्याप प्रतिक्षा आहे.
सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झाली असून यात एक जण बीड जिल्ह्यातील असून दुसरा व्यक्ती मूळची श्रीरामपूर तालुक्यातील असून पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 873 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 250 जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे आतापर्यंत 844 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 26 जणांचे अहवाल पॉझिटिव आले. 728 जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. एकूण 466 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.