सांगवी – गेल्या काही महिन्यापासून सांगवीतील जलतरण तलावाची दुरवस्था झाली असून, पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दुखापती होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. येथील तुटलेल्या साहित्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विशेषतः तलावातील स्टेनलेस स्टीलची सिडी तुटलेली आहे.
भिंतीवरील कंपाऊंडची उंची वाढवली असून त्यांना पत्रे लावणे आवश्यक होते, मात्र तसे करण्यात आले नाही. तसेच तलावातील ग्रॅनाईट पट्ट्या निघाल्या आहेत. एवढेच नाही, तर एकही बाथ शॉवर उपलब्ध नाही. तलावाच्या आजूबाजूला अनावश्यक वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. त्यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच पाणी साचून डेंग्यू सारख्या आजाराचे डास निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत मागणीचे निवेदन महापालिका क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले आहे.