कै.रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धा
पुणे – शुभम धायगुडे, युवराज वालिया यांनी पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै. रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत रविवारी दुहेरी मुकुट मिळवला. टिळक जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. केपी क्लबच्या शुभम धायगुडेने 1500 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात 17 वर्षांखालील मुले आणि खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले.
यानंतर युवराज वालियाने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 17 वर्षांखालील आणि खुल्या गटात सुवर्णयश मिळवले.
तर, 17 वर्षांखालील मुलींच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात मेदिनी जोशीने 00.36.43 सेकंदात स्पर्धा पुर्ण करत सुवर्णपदक तर, रुचिता कदमने 00.36.57 सेकंदात पुर्णकरत रौप्यपदक पटकावले व अवनी हयातनगरकरने 00.38.25 सेकंदात स्पर्धा पुर्ण करत कांस्यपदक पटकावले.
तर, मुलांच्या खुल्या गटातील 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात हर्षल वखारिया, साहिल पवार आणि श्वेजल मानकर यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. तर, मुलींच्या खुल्यागटातील 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात युगा बिरनाळे, मेदिनी जोशी आणि युक्ता वखारिया यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. ,