पुणे – मदर्स रेसिपीच्या संयुक्त सहकार्याने अपंग व मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी मदर्स रेसिपी जलतरण स्पर्धा गेल्या 25 वर्षांपासुन आयोजित केली जाते. या वर्षी ही स्पर्धा रविवार दिनांक 10 फेब्रुवारी 2019 रोजी बालकल्याण जलतरण तलाव, औंध रोड, पुणे येथे आयोजित केली आहे. पुणे, अहमदनगर, नारायणगाव, भोर इत्यादी भागातून अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय जलतरणपटू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत.
या उपक्रमासाठी समाजाकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, अपंग व मुकबधीर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तसेच समाजाला देखील या स्पर्धेतून प्रेरणा व स्फुर्ती मिळत असते. या वर्षी हा उपक्रम बालकल्याण संस्था, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे. तसेच जलतरण स्पर्धेशिवाय टेबल टेनिस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन लायन्स प्रांत 3234डी-2 चे उपप्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते सकाळी 9 बाजता होणार आहे. तसेच स्पर्धेचा समारोप व पारितोषक वितरण समारंभ दुपारी 12.30 वाजता मदर्स रेसिपी (देसाई ब्रदर्स लि) चे चेअरमन नितिनभाई देसाई व लायन्स प्रांत 3234 डी- 2 चे प्रांतपाल लायन रमेश शहा यांच्या हस्ते होणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा