Tokyo Olympics : वीरधवलचे युझरवर ताशेरे

टोकियो  – गुणवत्ता नसलेल्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पाठवणे थांबवा. ही ऑलिम्पिक आहे, क्‍लब दर्जाची स्पर्धा नाही, अशी टीका सोशल मीडियावर एका युझरने केली होती. त्यावर भारताचा अनुभवी जलतरणपटू विरधवल खाडे याने चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

विराट कोहली प्रत्येक सामन्यात शतक फटकावत नाहीत, मग बीसीसीआयने आता कोहलीलाही प्रत्येक स्पर्धेत पाठवायचे की नाही याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दात विरधवलने आपला संताप व्यक्‍त केला आहे.

खेळाडू अत्यंत मेहनत घेत ऑलिम्पिकची पात्रता मिळवतात. ते कोणत्या परिस्थितीचा सामना करतात हे माहिती नसताना अशी टीका करणे येग्य नाही, असेही त्याने या युझरला सुनावले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.