Swiggy share price – ऑनलाइन अन्नपुरवठा आणि किराणा मालपुरवठादार असलेल्या स्विगी कंपनीचे शेअर बाजारावर बुधवारी धुमधडाक्यात नोंदणी झाली होती.त्यानंतर कंपनीच्या शेअरचा भावही वाढला होता. मात्र गुरुवारी गुंतवणूकदारांनी बरीच नफेखोरी केल्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव सहा टक्क्यांनी कमी होऊन 429 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला.
त्यामुळे कंपनीचे बाजार मूल्य एकाच दिवसात 5,842 कोटी रुपयांनी कमी होऊन 96,279 कोटी रुपये इतके झाले. बुधवारी नोंदणीच्या दिवशी आयपीओच्या शेअरपेक्षा कंपनीचा भाव 17 टक्क्यानी वाढून 390 रुपये प्रति शेअरवर गेल्यामुळे कंपनीचे बाजार मूल्य नोंदणीच्या दिवशी एक लाख कोटी रुपये इतके झाले होते. या आयपोच्या माध्यमातून कंपनीने 11,327 कोटी रुपये उभे केले आहेत.
या रकमेचा वापर कंपनी कर्ज परतफेड आणि इतर भांडवली खर्चासाठी करणार असल्याचे सांगण्यात आले. हा आयपीओ यशस्वी झाल्याबद्दल कंपनीच्या व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात कंपनीचा महसूल आणि नफा वाढण्याची जास्त शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले.