“झुंड” येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा ”झुंड” चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून  सुरु आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. यातच अनेक अडचणींना सामोरे जात या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख  दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जाहीर केली आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ट्विट करून माहिती दिली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

”झुंड” चित्रपटाची शुटींग नागपूर येथे पूर्ण झाली आली. या दरम्यान बिग-बी यांनी नागपूर परिसरात काढलेली छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये चक्क बैलगाडीचा आनंद घेत त्यांनी आपल्या गावाकडच्या आठवणींना पुन्हा एकदा अनुभवल्याचे सांगितले आहे. तसेच कॉलेज काळातील बसचा प्रवास अनुभवल्याचे फोटो शेयर केले आहे. अशा असंख्य अडचणींनंतर ‘झुंड’चे चित्रीकरण नागपुरात यशस्वीरित्या पार पडले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×