हातभट्टीची वाहतूक करणारा छोटा टेम्पो स्वारगेट पोलिसांनी पकडला

पुणे- हातभट्टीची वाहतूक करणारा एक पॅगो टेम्पो स्वारगेट पोलिसांनी पकडला. यामध्ये प्लॅस्टीकच्या कॅनमध्ये 140 लीटर दारू होती. दारूची वाहतूक केल्याप्रकरणी शिवम उर्फ शिवा गणेश माने (22), संग्राम उर्फ बाळा गणेश माने (21), शुभम उर्फ शुभ्या अच्युत माने (23,सर्व रा. आण्णाभाऊ साठे वसाहत अप्पर बिबवेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गस्ती पथकाला एका टेम्पोमधून हातभट्टीच्या दारूची वाहतूक होत असताना माहिती मिळाली होती. त्यानूसार डायसप्लॉटकडे जाणाऱ्या टेम्पोला पाठलाग करुन पकडले. यावेळी टेम्पोमध्ये 35 लीटरचे चार कॅन आढळून आले. त्यामध्ये 140 लीटर हातभट्टीची दारु होती. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जायभाय,पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांच्या पथकाने केली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.