पुणे : स्वारगेट एसटी स्थानक परिसरात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. 893 पानांचे हे दोषारोपपत्र असून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरुद्ध शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने 52 दिवसात हा तपास पुर्ण केला आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास परगावी निघालेल्या एका प्रवासी तरुणीकडे आरोपी गाडेने वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर तरुणीला एका शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा लावून त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन दोनदा बलात्कार केला होता. या घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते.