आप उमेदवाराच्या प्रचारार्थ अभिनेत्री स्वरा भास्करचा रोड शो

नवी दिल्ली – देशभरामध्ये सध्या १९वी लोकसभा स्थापन करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका सुरु आहेत. यंदा देशभरामध्ये ७ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार असून यापैकी ५ टप्प्यांमधील निवडणुका आतापर्यंत पार पडल्या आहेत. येत्या १२मे’ला लोकसभा निवडणुकांचा ६वा टप्पा पार पडणार असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींनी सहाव्या टप्प्यातील मतदारसंघांकडे प्रचाराच्या तोफा वळविल्या आहेत.

दरम्यान, दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये सहाव्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार असल्याने सध्या दिल्लीमध्ये विविध राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आज भारतीय जनता पक्षावर प्रखर टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील प्रचारामध्ये सहभाग नोंदवला. पूर्व दिल्ली मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतीशी यांच्या प्रचारार्थ स्वरा भास्कर एका रोडशोमध्ये देखील सहभागी झाली होती.

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पूर्व दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतीशी यांच्यासोबत प्रचार करताना

स्वरा भास्कर हिने यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये उपस्थिती लावली असून तीने यापूर्वी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या प्रचारार्थ विविध सभांमध्ये हजेरी लावली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.