मुंबई – हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा खात्मा केला आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर अभिनेत्री स्वरा भास्करने चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
This is not justice. This is the police breaking the law . It’s dangerous. The legal system exists for a reason. https://t.co/5aoSRTLt2I
— Faye DSouza (@fayedsouza) December 6, 2019
दरम्यान, स्वराने या घटनेवर पत्रकार फाये डिसूजा यांचे ट्विट रिट्विट करत अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा न्याय नाही. पोलिसांनी कायदा तोडला. हे धोकादायक आहे,’ असे ट्विट फाये डिसूजा यांनी केले आणि स्वराने नेमके हेच ट्विट रिट्विट केले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा