स्वरा भास्कर आणि हिमांशू शर्माचे ब्रेकअप

स्वरा भास्कर आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता पटकथा लेखक हिमांशू शर्मा यांच्यातील रिलेशनशीप आता संपुष्टात आली आहे. गेली पाच वर्षे हे दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. कंगणा रणावतच्या “तन्नू वेडस मन्नू’मध्ये एकत्र काम करायला लागल्यापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही “तन्नू वेडस मन्नू रिटर्न्स’ आणि “रांझणा’साठीही एकत्र काम केले होते. सर्वात शेवटी “निल बट्टे संटा’मध्येही दोघांनी एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या क्रिएटिव्ह डायरेक्‍शनची जबाबदारीही हिमांशूवर होती. मात्र भविष्यात आपले रिलेशनशीप काय असावे, याबाबत दोघांमध्येही एकमत झाले नाही.

त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असे काही निकटवर्तीयांनी सांगितले. अद्याप या दोघांनी आपल्या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केलेली नाही. या दोघांनी आपल्या रिलेशनशीपबाबत बरेच काही बोलले होते. स्वरा आणि हिमांशूच्या विदेशातील ट्रीपचे फोटो स्वराने सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप हा अनेकांसाठी धक्कादायक आहे.

हिमांशू शर्माने आनंद एल. राय यांच्य “झिरो’साठीही पटकथा लेखन केले होते. आता आनंद एल. राय यांच्याच पुढच्या प्रोजेक्‍टसाठीही तो कथा लेखन करणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.