मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. यामुळे काही लोक तिची स्तुती, तर काही जण स्वराला ट्रोल देखील करतात. आता सोशल मीडियावर स्वरा भास्कर लवकरच आई होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
परंतु लग्न न करताच स्वरा भास्कर आई होणार असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या मुलाचे बाबा कोण असणार आहे? ज्यामुळे पुन्हा एकदा स्वरा चर्चेत आली आहे. परंतु स्वरा भास्कर प्रेग्नेंट नसून ती मूल दत्तक घेणार आहे. ज्याच्यासाठी तिने कार्यवाही सुरू केली आहे.
अभिनेत्रीने संभाव्य दत्तक पालक म्हणून साइन इन केले. सध्या ती मूल दत्तक घेण्यासाठी प्रतीक्षा यादीत आहे. वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास स्वरा भास्कर लवकरच “शीर कोरमा’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.
या चित्रपटात ती एका लेस्बियनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमीही आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी यांनी केले आहे.