वादग्रस्त विधानामुळे स्वरा भास्कर पुन्हा एकदा ट्रोल

स्वरा भास्कर आपल्या सिनेमापेक्षा आपल्या वादग्रस्त विधानामुळेच अधिक चर्चेत असते. आता तिने पुन्हा एकदा असेच वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे पब्लिकने तिची शाळा घ्यायला सुरुवात केली आहे. स्वराच्या विधानावर नेटिझन्सनी केलेल्या कॉमेंट बघितल्या की असे वाटते की लोक स्वराच्या एखाद्या वादग्रस्त ट्‌विटची वाटच बघत बसले होते की काय.

दरम्यान, स्वराने आता केलेले वादग्रस्त विधान एका 4 वर्षीय मुलाला अपशब्द वापरल्या संदर्भातले आहे. स्वराने काही दिवसांपूर्वी‘सन ऑफ एबिश’ चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये एका बालकलाकाराबद्दल बोलताना दिसत आहे. या मुलाबद्दल बोलताना स्वरानं अपशब्द वापरल्याचं दिसत आहे. हा किस्सा स्वराच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातला आहे. त्यावेळी ती जाहीरातींसाठी काम करत असे. यावेळी अशाच एका जाहीरातीच्या शूटिंगच्या वेळी स्वराला एका 4 वर्षाच्या लहान मुलानं आंटी म्हटलं होतं. ज्यामुळे तिला त्याचा खूप राग आला होता.


या शो दरम्यानचा व्हिडीओ क्लिपमध्ये स्वरा म्हणाली, ‘मला त्याचा खूप राग आला. तो मुलगा खरंच खूप दुष्ट होता.’ पण स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. याशिवाय #SwaraAunty हा हॅशटॅग सुद्धा ट्विटरवर ट्रेंड झाला होता. यापूर्वीही स्वरा अनेकवेळा आपल्या बिनधास्त वक्‍तव्यांमुळे अडचणीत आली आहे. ट्‌विटरवरच्या प्रत्येक हॅशटॅग कॅम्पेनमध्ये ती सहभागी होत असते. आताच्या आपल्या ट्‌विटवर झालेल्या ट्रोलिंगवरून मात्र तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.