स्वरा भास्करने कंगनावर टाकला ऍटम बॉंब

नवी दिल्ली – स्वरा भास्करने एक ट्विट करून अभिनेत्री कंगना राणावतला चांगलेच फैलावर घेतले आहे. स्वराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “काही लोक सरकारने दिलेला पुरस्कार वापस करण्याची भाषा करीत होते.’

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात एम्सने घोषित केले की, सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वराने ट्विट करीत कंगनावर ऍटम बॉंब टाकला आहे. सुशांत प्रकरणात कंगनाने तिला सरकारने दिलेला पुरस्कार परत करण्याचे बोलली होती. यावर स्वराने कंगनाला कात्रीत पकडले असून हे ट्विट लगेच भरपूर प्रमाणात व्हायरल झाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.

स्वरा ट्विटमध्ये पुढे म्हणाली, आता सीबीआय आणि एम्स दोन्ही या निष्कर्षावर पोहोचले आहेत की, सुशांतचा दुःखद मृत्यू एक आत्महत्याच आहे.

कंगनाने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सुशांत प्रकरणात पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे वक्‍तव्य केले होते. दरम्यान, कंगनाने सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना धारेवर धरले होते. मात्र आता कंगनाविरोधात अनेक जणांनी कंबर कसली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.