मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच ट्रोल होत असते. ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रेग्नेंट असल्याच्या मुद्यावरून ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्सनी स्वरा भास्करच्या प्रेग्नेंसीची बातमी पसरवली, त्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
सोशलवर बनावट स्क्रीनशॉटमध्ये स्वरा भास्कर जुलैमध्ये मुलाला जन्म देऊ शकते, असे लिहिले आहे. व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, ‘बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर प्रेग्नंट झाली, पती फवाद अहमदने याबाबत सांगितले आहे. अभिनेत्रीची प्रसूती जुलै महिन्यात होऊ शकते.’ या पोस्टवर संमिश्र प्रतिकिया येत आहे.
दरम्यान ‘बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्तर प्रेग्नंट आहे. तिचा पती फवाद अहमदने याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री जुलै महिन्यात बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. स्वराने ८ वर्षांनी लहान फवादशी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली’ या आशयाचे ट्वीट एका वृत्तवाहिनीने केले होते.
सोशल मीडियावर हे ट्वीट तुफान व्हायरल झाले. त्यानंतर काहीच वेळात त्या वृत्तवाहिनीने ‘अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधीत करण्यात आलेले ट्वीट हे फेक आहे. असे कोणतेही ट्वीट आम्ही केलेले नाही’ या आशयाचे ट्वीट केले. तिने या फेक ट्विटबाबत आता कोर्टात धाव घेतली आहे.
दरम्यान स्वराने फेब्रुवारीमध्येच ८ वर्षांनी लहान फवादशी लग्न केले. यापूर्वी लग्न न करताच स्वरा भास्कर आई होणार असल्याच्या चर्चा सोशलवर रंगल्या होत्या. तसेच मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती.